Tuesday 3 January 2012

लपंडाव


खूप दिवस झाले लपंडाव खेळून 
रात्रीची हि दमछाक करून
खेलासारखेच आताही हि लपंडाव च खेळतोय मी
माझ्या सुखाशी लपून बसतोय मी 

लहानपणी किती छान होते.
दिवस रात्र फक्त खेळच खेळ होते.
कधी चेंडू फळी तर कधी सोनसाखळी ची रात असे.
होळी ला तर रात्रभर धमाल असे.
पण त्यातल्या त्यात लपंडाव तर सगळ्यांना खेळावेसे वाटे.
त्यात डाळ भात पाणी करून सुटायची मजा होती.
तर कधी कोनात  स्वताहून राज्य घ्यायची हुक्की असे. 
राज्य आल्यावर मात्र घरी पळून जाणे जास्त सोयीस्कर वाटे. 
पण आता काय राज्य आले तरी खेळ संपवणे हेच आम्हाला जाणे. 


छोटू मोनू आणि राजू तर नेहमी ७ वाजता खाली येत होते.
अर्धा वेळ भांडण करून शेवटी मोनू वर राज्य येत होते 
धप्पा करून त्याला अक्षरश रडकुंडीला आणत असे.
त्याला सारखे आतली बाटली फुलती म्हणून त्रास देत असे.

पण छोटू खूप आचरट होता.
cheating  करण्यात मास्तर होता.
कच्चा लिंबू बनून सुटायला पण तयार नसे.
आम्ही सगळे out  झालो तरीही सापडत नसे. 
कधी घरी जाऊन लपत असे तर कधी out झाला तरी लपून बसे.

अजून हि आठवते ती अडगळ आणि तो लपंडाव.
धप्पा करून मोनुची झालेली ती रडारड.
cheating करून छोटू ने केलेली भांडणं.
आणि कपडे मळल्यावर आई ने केलेली कटकट.

तोच छोटू आता मोठा झाला आणि आता कविता करू लागला.
आयुष्याच्या या सुंदर वळणावर येऊन स्वताशी झगडू लागला.

लपंडाव खेळून खूप दिवस होऊन गेले.
लपण्याच्या त्या जागा आता अडगली बनून तसाच पडून राहिल्या.
सुटण्याची ती मजा तशीच विरून गेली.
लपंडावच्या खेळाची जागा आता मनाच्या खेळाने घेतली.
जगायच्या गडबडीत लपंडावची मजा तसीच राहिली. 

चला मित्रानो पुन्हा एकदा लपंडावाचा डाव मांडू. 
कधीतरी भेटून बर्याच गप्पा हाकु.
धप्पा करून मोनुला परत रडवू.
आईची कटकट पुन्हा एकदा ऐकू.

1 comment: