Wednesday 4 January 2012

नाते

न तुटणारे असे हे म्हणजे नाते.
नाती म्हणावे तर अशी बरीच असतात.
पण काही नातीच मनाच्या अतिशय जवळ असतात.
नात हि रेशमाच्या धाग्यासारखी गुरफटलेली असतात.
म्हणावे तर कधी घट्ट तर कधी अतिशय नाजूक.
कधी खूप जवळची तर काही मनाच्या कोपऱ्यात दडलेली.
काही नाती ओळखीने होतात तर काही नाती आजकाल फक्त एका chat ने होतात.
काही नाती व्यक्त न करता येणारी तर काही मनाला सुखावणारी.

कधी मायेची नाती तर काही रागाची नाती.
कधी जिवाभावाची तर कधी फक्त नावाची नाती.
पण काहीही असले तरी जपावी लागतात हि नाती.

न बोलता काही नाती बरेच काही बोलून जातात.
तर काही नाती बोलल्याशिवाय जपली जाताच नाहीत.

म्हणायला गेलो तर असे चालता चालता वाटेशी हि काहीसे घट्ट नाते बनून जाते.
रोज आपलीच वाटणारी वाट खूप काही बोलून जाते.
कधी एकटा असतानाही खूप चांगली साथ देते.
कधी हीच वाट मनाला १ चांगला संगीत आणि सूर शिकवून जाते.

मनाला सुखद असे क्षण आणि अनुभव हे अशी नातीच देऊन जातात.
जगण्याला ध्येय आणि स्फूर्ती पण ह्या नात्यामुळेच येतात.

म्हणून जीवनात ह्या नात्यामुलेच महत्व येते.
आणि एकट्या जीवनाला हि नातेच फुलवून जाते.

म्हणून जीवन म्हणजे फक्त..नाती नाती आणि नातीच...

बाबा

आयुष्याच्या या वळणावर उभा झालो मी.
कारण माझ्या मागे होतात तुम्ही.
आईच्या प्रेमामुळे झालो मी मोठा.
तुमच्या पाठींब्याने झालो स्वताच्या पायावर उभा.
मला आठवते तुमच्या चेहऱ्यावरचे ते निर्धास्त भाव.
जेव्हा मी झालो माझ्या पायावर उभा.

नाही बोलू शकलो तुम्हाला कि किती जीव आहे तुमच्यावर 
कारण बोलायचे धैर्य न्हवते माझ्यात.
म्हणून या कवितेत माझ्या भावनांची शोधतोय मी वाट. 

आई सारखे प्रेम नाही जगात दुसरे.
पण हे हि आहेच कि बाबांसारखे मन नाही कोणात इथे.

ठेचा खाऊन तुम्ही वाढवलेत मला पण नाही कधी बोललात कुणा.
मला बरे नसताना माझ्या उशासी बसलात तुम्ही.
माझ्या भविष्यसाठी उपासतापास केलेत तुम्ही.
याच प्रेमाची नाही मी परतफेड करू शकत तुम्हा. 
चुका किती झाल्या माझ्या कडून पण तुम्ही त्या नेहमी माफ केल्या.
तुमचे हे मन मी कधीच ओळखू शकलो नाही.

वेचले तुम्ही स्वतः चे आयुष्य मला वाढवता वाढवता 
तुम्ही चालत इकडे तिकडे फिरले माझ्या शिक्षणाकरिता.
टाकले तुम्ही सगळीकडे शब्द माझ्या नोकरीकरिता.
उपाशी झोपलात तुम्ही माझ्या पोटाकरिता.

ह्या प्रेमाची नाही कोणी करू शकत तुला.
फक्त तुमची आयुष्यभर सेवा करायची संधी द्या मला.

रात्र

जसे रात्र या शब्दात जसे गूढ आहे
कधी काही होईल ते कोणाला सांगता येते. 

रात्रीच्या  अंधारात खूप शांतता आहे.
का कळेना तिच्या मनात तरी नक्की काय आहे.
तिच्या सवेत छान स्वप्नात गुंतून जावे असे वाटते.
पण का कळेना सकाळी याच स्वप्नाचा चुराडा होईल कि नाही याची भीती वाटते

 हि काळी रात्र कधी जीवाची घालमेल करते 
तर कधी मनात खूप आशा हि देऊन जाते.
दिवसा झालेल्या त्रास झटकन विरघळून टाकते.
आणि पुढच्या प्रवासासाठी नवी सुरवात करून देते.

कधी कधी गार थंडीने अंग शहारून टाकते 
तर कधी घटत काळोखाने जीव खालीवर करते.
हीच रात्र आपल्या लोकांबरोबर घालवायला काही क्षण देते.
मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक सुखद अनुभव देते.

जर म्हटले तर रात्र हे फक्त दोन शब्द आहेत. 
पण याच दोन शब्दात रात्र आपल्या काळ्या अंधारात खूप काही सामावून घेते. 
आपल्या गूढ विश्वात हि बरेच काही लपवून ठेवते. 
रात्र हि पुढील उगवणाऱ्या दिवसाची १ सावली असते.
जी थकलेल्या या मनास एक विश्रांती देते.
आणि नवीन येणाऱ्या ध्येयाला गाठण्याची ताकद देते.
मनास मस्त पैकी आपल्या कुशीत गुरफटून घेते.

Tuesday 3 January 2012

लपंडाव


खूप दिवस झाले लपंडाव खेळून 
रात्रीची हि दमछाक करून
खेलासारखेच आताही हि लपंडाव च खेळतोय मी
माझ्या सुखाशी लपून बसतोय मी 

लहानपणी किती छान होते.
दिवस रात्र फक्त खेळच खेळ होते.
कधी चेंडू फळी तर कधी सोनसाखळी ची रात असे.
होळी ला तर रात्रभर धमाल असे.
पण त्यातल्या त्यात लपंडाव तर सगळ्यांना खेळावेसे वाटे.
त्यात डाळ भात पाणी करून सुटायची मजा होती.
तर कधी कोनात  स्वताहून राज्य घ्यायची हुक्की असे. 
राज्य आल्यावर मात्र घरी पळून जाणे जास्त सोयीस्कर वाटे. 
पण आता काय राज्य आले तरी खेळ संपवणे हेच आम्हाला जाणे. 


छोटू मोनू आणि राजू तर नेहमी ७ वाजता खाली येत होते.
अर्धा वेळ भांडण करून शेवटी मोनू वर राज्य येत होते 
धप्पा करून त्याला अक्षरश रडकुंडीला आणत असे.
त्याला सारखे आतली बाटली फुलती म्हणून त्रास देत असे.

पण छोटू खूप आचरट होता.
cheating  करण्यात मास्तर होता.
कच्चा लिंबू बनून सुटायला पण तयार नसे.
आम्ही सगळे out  झालो तरीही सापडत नसे. 
कधी घरी जाऊन लपत असे तर कधी out झाला तरी लपून बसे.

अजून हि आठवते ती अडगळ आणि तो लपंडाव.
धप्पा करून मोनुची झालेली ती रडारड.
cheating करून छोटू ने केलेली भांडणं.
आणि कपडे मळल्यावर आई ने केलेली कटकट.

तोच छोटू आता मोठा झाला आणि आता कविता करू लागला.
आयुष्याच्या या सुंदर वळणावर येऊन स्वताशी झगडू लागला.

लपंडाव खेळून खूप दिवस होऊन गेले.
लपण्याच्या त्या जागा आता अडगली बनून तसाच पडून राहिल्या.
सुटण्याची ती मजा तशीच विरून गेली.
लपंडावच्या खेळाची जागा आता मनाच्या खेळाने घेतली.
जगायच्या गडबडीत लपंडावची मजा तसीच राहिली. 

चला मित्रानो पुन्हा एकदा लपंडावाचा डाव मांडू. 
कधीतरी भेटून बर्याच गप्पा हाकु.
धप्पा करून मोनुला परत रडवू.
आईची कटकट पुन्हा एकदा ऐकू.

प्रेम


प्रेम....नावातच १ ओलावा आहे..
पण केले तर लोक म्हणतात के फालतूपना आहे
प्रेम झाले तेहि नकळत झाले
पण कधी न्हवे ते आता त्याच प्रेमा पासून पलुन जावेसे वाटले

प्रेम करताना खुप कही मनात होते.
प्रत्येक वर्षाच्या त्या दिवाच्या celebration चे प्लानिंग होते 
अणि आताही ते मनातच राहिले. 
काही क्षणातच या प्लान्निंग चे तुकडे झाले.

दिवसातून १०० वेळा वाजणारा  येणारा हा फोन आता गप्प झालाय.
मनाची चाल बिचल मात्र तशीच राहिली.

हातात हात घालून मारलेल्या गप्पा 
ट्रेन मध्ये खिडकी जवळ बसून गार हवेची घेतलेली ती मजा 
सारे काही त्या हवेतच विरून गेले 
मनात मात्र राहिल्या त्या सुखद आठवणी
 या आठवणी मधेच आता जगणे आहे.
पण का कळेना या मनाच्या कोपऱ्यात एक घालमेल आहे.  

खूप वाटे कि ती मला समजून घेईल 
कधीतरी येऊन मला जवळ घेईल.
आणि मनातील  सगळे मळभ दूर होईल.

पण आता हे सगळे मनातच राहील
कारण ती आता तिच्या नवऱ्याच्या बरोबर सुखी राहील.

१० दिवसाच्या ओळखीवर त्याला तिची आयुष्य भर साथ मिळेल.
पण माझे काय या ५ वर्षाच्या या ओळखीत मी तर पूर्ण विरहात राहीन.

प्रेम म्हणजे हे असे असेल तर मी त्यात बुडून जाणार.
कारण तिच्या आठवणीतच मी जगणार.

मैत्री


मैत्री हि कशी असावी तर तुझी आणि माझी आहे तशी असावी.
नावाच्या बदली या मैत्रीत काही टोपण नवे असावी.
जीवनाच्या चार घटका का होईना पण मनाला सुख देणारी असावी.
उन्हातून एकट चालताना जसे पावसाचा शिडकाव व्हावा तशी असावी.

कधी रुसवा असावा तर कधी मस्करी असावी.
कधी कडाक्याचे भांडण असावे तर कधी मस्ती करण्याची लहर असावी.
कधी डोळ्यात पाणी आसवे तर कधी खदखदून हसून पोट दुखवणारी असावी.
तर कधी काही फुटकळ गप्पा असाव्यात तर कधी काही समजुतीचे बोल असावे.

रात्रभर दूरध्वनी वर गप्पा मारणारी असावी 
तर रात्री उशिरा कधी फक्त missed call देऊन झोपेचा खोळंबा करणारी असावी.  
कधी रात्रभर उशिरा पर्यंत एकत्र बसून अभ्यास करणारी असावी
तर कधी चहाच्या टपरीवर पैसे देण्यासाठी झालेल्या भांडणं सारखी असावी.

कधी तर्राट होऊन एक दुसऱ्याच्या वायफळ बडबड ऐकून घेणारी असावी
तर कधी गाडी चालवण्यासाठी एकमेकांशी हुज्जत घालणारी असावी.
कधी पेट्रोलचे भाव वाढलेले असताना सरकारला शिव्या घालणारी असावी.
तर कधी राजकारण न कळताना राजकारण्याच्या फालतू गप्पा मारणारी असावी.

कधी मुलींच्या गप्पा मारताना फालतू विनोद करणारी असावी.
कधी एकमेकांना प्रेम बद्दल गप्पा मारणारी असावी.

अशी हि मैत्री आयुष्यभर असावी.
मनात घर करून घट्ट कवटाळून जीव ओवाळून देणारी असावी.
मैत्रीचे काही बोल हे मनातच राहून जातात.
पण काही चुकले तर पूर्ण वेळ जीव खात राहतात.
माफ कर या मित्रास जर काही चुकले असेल.
जास्त काही मागू नको यार सिर्फ एक बार गले मिल यार